पवना धरणात बुडून इन्फोसिसच्या IT इंजिनीयरचा मृत्यू

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – पवना धरणात बुडून तरूणाचा मृत्यु झाल्याची घटना आज (शनिवारी) घडली आहे. गेल्या दोन आठवडयामधील धरणात बुडून मृत्यू झालेल्यांची संख्या आता 3 वर जावुन पोहचली आहे. युवकाचा बुडून मृत्यु झाल्याने खळबळ उडाली आहे.

अतुल अनिलकुमार गगन (23, रा. पटणा, सध्या रा. इन्फोसिस, हिंजवडी) असे धरणात बुडून मृत्यू झालेल्याचे नाव आहे. ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हिंजवडीच्या आयटी पार्क येथील 5 जण दुपारी पवना धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. ते पोहण्यासाठी धरणामध्ये उतरले असता पाण्यात बुडून अतुल गगनचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अतुल अनिलकुमार गगन हा  इन्फोसिसमध्ये IT इंजिनीयर म्हणून कामाला होता.

दरम्यान, शिवदुर्ग मित्रची रेस्क्यु टीम देखील घटनास्थळी पोहचले. पावणे 5 वाजण्याच्या सुमारास अतुलचा मृतदेह बाढेर काढण्यात शिवदुर्गच्या पथकाला यश आले. त्यासाठी शिवदुर्गचे राहुल देशमुख, मोरेश्‍वर मांडेकर, कुंभार सागर, महेश मसणे, विकास मावकर, गणेश गायकवाड, दुर्वेश साठे, सुनिल गायकवाड, राजेंद्र कडू आणि योगेश उंबेरे यांनी अथक परिश्रम घेतले.