पोकलेन उलटून कामगार युवकाचा मृत्यू, शिरूर तालुक्यातील भांबर्डे येथील हृदयद्रावक घटना

शिक्रापूर – शिरूर तालुक्यात भांबर्डे येथे काम सुरु असता पोकलेन उलटून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत पोकलेन चालकावर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भांबर्डे ता. शिरूर येथे एका बांधकामचे काम सुरु असताना तेथील पाण्याच्या टाकीचे बांधकाम करत असताना, काही मजूर बांधकामाच्या ठिकाणी काम करत असताना तेथे एक पोकलेन देखील होते. सदर पोकलेन च्या सहाय्याने काम सुरु असलेल्या टाकीमध्ये कालवलेल्या सिमेंट चा माल टाकण्यात येत होता. काम सुरू असताना अचानक पणे पोकलेन चालकाचा पोकलेन वरील ताबा सुटून पोकलेन टाकीमध्ये उलटला यावेळी टाकीमध्ये काम करत असलेला चमारसिंह मोरे हा पोकलेन च्या बकेट खाली चिरडला गेला यावेळी इतर कामगारांनी आरडाओरडा केल्याने घडलेला प्रकार निदर्शनास आला, घटनेबाबत माहिती मिळताच रांजणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगदाळे, पोलीस हवालदार अमिरबीन चमनशेख यांनी घटनास्थळी धाव घेतली, येथे पाहणी करत पोकलेन च्या बकेट खाली चिरडलेल्या चमारसिंह मोरे याला बाहेर काढले असता कामगार चमार सिंह गजरिया मोरे वय २९ वर्षे रा. भांबर्डे ता. शिरूर जि. पुणे मुळ रा. चोपाली पोस्ट हेलपडवा ता. झिरणीया जि. खरगोन मध्यप्रदेश हा पोकलेन खाली चिरडून जागीच मयत झाला असल्याचे निदर्शनास आले यावेळी पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला, याबाबत जगन नेहरू मोरे वय २४ वर्ष रा. भांबर्डे ता. शिरूर जि. पुणे मुळ रा. झोपाली पोस्ट हेलापाडावा ता. शिरगिथा जि. खरगोन राज्य मध्य प्रदेश यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी पोकलेन चालक रणवीर फुलेरादिया कुमार रा. भांबर्डे ता. शिरूर जि. पुणे मुळ रा. बरसम पोस्ट बलही जि. सहरसा राज्य. बिहार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश जगदाळे हे करत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like