धुळे : देवपूर पंचवटी जवळ पांझरा पात्रात तरुण वाहून गेला

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – अनंत चर्तुदशी निमित्त आज गुरवारी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत पांझरा नदी पात्रात मंडळाचे कार्यकर्ते व लहान मुले गणेश मुर्ती विसर्जन करण्यासाठी पांझरा नदी पात्र देवपूरातील पंचवटी जवळ आले. यावेळी पांझरा नदी पात्रात गणेश मुर्ती विसर्जन करते वेळी तरुणाचा पाय घसरुन पाण्यात वाहुन गेला आहे. भागवत पवार (वय 16) असे तरुणाचे नाव आहे.

हि बातमी पोलीसांना कळविण्यात आली. तातडीने शोध कार्य सुरु करण्यात आले आहे. परंतू अंधार व पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोध कार्यात अडथळा येत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like