इंदापूरात तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करून युवकाची हत्या

इंदापूर : पोलीसनामा आॅनलाइन (सुधाकर बोराटे) – रविवार दिनांक ९ डीसेंबर रोजी सायंकाळी ६ ते ६:३० वाजणेच्या दरम्यान इंदापुर येथिल इंदापूर बारामती रोडवर असणारे शासकीय औद्योगीक प्रशिक्षण केंद्राच्या समोरील रस्त्यावर एका २८ वर्षिय युवकाचा डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खुन करण्यात आल्याची घटना घडली आहे.

बाळासाहेब दत्तात्रय शेलार (वय २८, रा. कसबा इंदापूर, जिल्हा- पुणे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.,तर त्याचे सोबत असनारा त्याचे शेती काम करणारा सहकारी कामगार जावेद शेख (वय ३५, सध्या रा. इंदापूर, जिल्हा – पुणे) असे जखमीचे नाव आसुन, तीक्ष्ण हत्याराचा वार झाल्याने त्याच्याही डोक्याला गंभीर जखम झाली आहे.

गंभिर जखमी जावेद शेख
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब दत्तात्रय शेलार व त्याचा शेती कामगार जावेद शेख हे बुलेट मोटारसायकल नंबर एम. एच. ४२ एके ८०७९ वरुन इंदापूर ते बारामती राज्य मार्गावरुन जात असताना पाठीमागून येणाऱ्या स्कार्पिओ गाडीने जोराची धडक दिली. गाडी जवळपास पस्तीस फुट फरफटत नेली. त्यानंतर गाडीतील अज्ञात मारेकऱ्यांनी गाडीतुन पटकन खाली उतरून तीक्ष्ण व धारधार शस्त्राने वार करून बाळासाहेब दत्तात्रय शेलार याचा खून केला तर त्याच्या बुलेट मोटार सायकलवर पाठीमागे बसलेला सहकारी शेती कामगार जावेद शेख याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने तोही गंभिर जखमी झाला आहे. जखमिवर शासकिय उपजिल्हा रूग्णालय इंदापूर येथे उपचार सुरू आहेत.

या गंभिर घटनेची माहीती घटणा घडल्यानंतर इंदापूर शहरात वार्‍यासारखी पसरली. अंगाचा थरकाप उडविणार्‍या घटनेने इंदापूर शहर हादरून गेले आहे. सर्वसामान्य नागरीक दहशतीच्या वातावरणाखाली वावरत असल्याचे चीत्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. या गंभीर घटनेची खबर इंदापूर पोलिस स्टेशनला मिळताच इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक मधूकर पवार यांनी तात्काळ दखल घेवुन घटना घडली त्या ठिकाणी पोलिस पथक पाठवून जखमिंना इंदापुर येथिल उपजिल्हा रूग्णांलयात तात्काळ नेण्याची व्यवस्था केली.

उपजिल्हा रूग्णालय प्रभारी वैद्यकिय अधिक्षक एकनाथ चंदनशीवे यांनी दोघांची तपासणी केली असता यातील गंभीर जखमी बाळू शेलार मयत झाला असल्याचे घोषित केले. व मयत बाळू शेलार याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शवागारात पाठवूण देण्यात आला. तर जखमीवर रूग्णालयात लगेचच उपचार सुरू करण्यात आले.

या घटनेने संपूर्ण इंदापूर शहर हादरले आसुन शहरात तणावपुर्ण वातावरण आहे. कोणताही अणूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरिक्षक मधूकर पवार यांनी अतिराक्त पोलीस मदत मागवीली आहे. नागरिकांनी अफवा पसरविणार्‍यांवर कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. तर बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी घटना घडलेल्या ठिकाणी तात्काळ भेट देवून घटणास्थळाची पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे सुरू होते.