वडिलांनी लिंग बदलास नकार दिल्याने उच्चशिक्षीत तरुणाची आत्महत्या

चेन्नई : वृत्तसंस्था – लिंग बदल करून मुलगी बनण्याची इच्छा असलेल्या उच्चशिक्षीत तरूणाला त्याच्या वडिलांनी लिंग बदलास नकार दिल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. २१ वर्षीय तरूणाला मुलगी होण्याची इच्छा होती. मात्र वडिलांनी त्याला तसे करण्यास नकार दिल्याने तरूणाने आपले आयुष्य संपवले.

ही घटना तामिळनाडूमधील विरूगंबक्कम या ठिकाणी घडली आहे. विरुगंबक्कम येथे राहणारा पार्थसारथीनं (वय-२१) याने वडिलांकडे लिंग बदल शस्त्रक्रिया करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मात्र वडिलांनी नकार दिल्याने तो घरच्यांसोबत भांडून घर सोडून निघून गेला. घर सोडल्यानंतर तो एका महिलेच्या घरी राहत होता. हे त्याच्या वडिलांना समजताच ते त्याला घरी नेण्यासाठी गेले.

परंतु त्याने शस्त्रक्रिया करण्यास होकार दिला तरच घरी येईन असा निर्णय घेतला. मात्र, वडिलांना त्याची मागणी मान्य नसल्याने त्यांनी नकार दिला. वडिलांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिल्याने नाराज झालेल्या पार्थसारथीनं याने गळफास घेऊन आत्महत्या केली.पार्थसारथीनं याने बीसीएची पदवी मिळवली होती. बीसीए झाल्यांतरही नोकरी न मिळाल्याने तो बेरोजगार होता.

वडिलांनी त्याच्यावर नोकरी करण्याचा दबाव टाकला परंतु त्याने वडिलांच्या दबावाला बळी न पडता नोकरी करण्यास नकार दिला. काही दिवासांपासून त्याने मित्रांना भेटण्याच टाळत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading...
You might also like