सैन्य भरतीला आलेल्या युवकाकडे सापडली २ ग्रेनेड

जम्मू : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर मधील पुंछ जिल्ह्यात लष्कराच्या तळाजळ प्रादेशिक सैन्य भरतीसाठी आलेल्या एका युवकाकडे दोन ग्रेनेड सापडल्याने खळबळ उडाली आहे. या युवकाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजिंदर सिंह असे या युवकाचे नाव आहे. तो कालाकोटे भागातील रहिवाशी आहे. तो प्रादेशिक सैन्य भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी आला होता. पुंछ जिल्ह्यातील सुरनकोट येथील लष्करी तळ परिसरात सकाळी अकराच्या सुमारास तो संशयास्पद फिरताना दिसला.

सुरक्षा जवानांनी त्याला थांबवून त्याची अंगझडती घेतली. त्याच्याकडे दोन ग्रेनेड सापडली. त्याच्याकडून अंडर-बॅरेल ग्रेनेड लाँचर आणि हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. त्याला तात्काळ अटक करुन पुढील चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाच पोलीस कसून तपास करीत आहेत.

ह्याहि बातम्या वाचा

लोणावळ्यात बंगल्यात जुगार अड्डा ; पोलिसांचा छापा ३० जण ताब्यात

युतीने आठवड्याभरात जागावाटपाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा,अन्यथा… : घटक पक्षांचा इशारा

पूर्ण रमजानच्या महिन्यात मतदान थांबवणे शक्य नाही : निवडणूक आयोग

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊच शकत नाही ‘या’ नेत्याचे वक्तव्य