काय सांगता ! होय, हिर्‍यावर ‘कोरलं’ PM मोदींचं ‘चित्र’, दररोज करावी लागली 5 तास ‘मेहनत’ अन् लागले ‘एवढे’ रूपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुरतच्या कतारगाव येथील एका तरुणाने डायमंड (हिरा) वर वेगळ्या पद्धतीने कलाकृती तयार करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. या तरुणाने हिऱ्याला भारताच्या नकाशाचा आकार दिला असून यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची आकृती तयार केली आहे. आकाश सलिया नावाच्या युवकाने भारताच्या नकाशामध्ये लेजर इंस्क्रिप्शन असलेली दीड कॅरेटची पंतप्रधान मोदींची आकृती बनविली आहे. या तरुणास हा हिरा पंतप्रधानांना भेट करावयाचा आहे.

आकाशने २०१४-१५ मध्ये आंतरराष्ट्रीय जेम्स अँड ज्वेलरी स्कूलमध्ये शिकत असताना एका हिऱ्याला भारताच्या नकाशाचा आकार देण्याचे काम सुरु केले होते.

१९९८ मध्ये हिरा खरेदी केला होता
आकाश ने म्हटले की, वर्ष १९९८ मध्ये माझ्या एका जवळच्या नातेवाईकाने एक तीन कॅरेटचा हिरा खरेदी केला होता. त्यावेळेस त्याची किंमत ४५ हजार रुपये होती. १४ वर्षानंतर या हिऱ्यास जेव्हा मी पाहिले तेव्हा मला त्यात भारताचा नकाशा दिसल्याचा भास झाला. यामागील कारण म्हणजे लहानपणापासून माझ्या मनात निर्माण झालेल्या देशभक्तीच्या भावनेमुळेच हे झाले असावे, पण हिरा पाहिल्यानंतर त्या हिऱ्यात भारताचा नकाशा बनवण्याचा विचार माझ्या मनात आला आणि मी त्यावर काम करण्यास सुरवात केली.

हिरा १.४६ कॅरेटचा होता
त्याने सांगितले की या विशिष्ट हिऱ्यावर रोज पाच तास काम केल्यानंतर सुमारे दोन महिन्यांमध्ये हिऱ्याचे नकाशात रूपांतर झाले. हे काम इतके सोपे नव्हते, कारण लेझरच्या साहाय्याने हे काम करावे लागणार होते आणि लेझरच्या साहाय्याने हिरा तुटण्याची संभावना असते. जेव्हा हा हिरा भारताच्या नकाशामध्ये रूपांतरित झाला, तेव्हा हिरा १.४६ कॅरेटचा होता आणि जेव्हा नकाशा तयार झाला तेव्हा त्यास सलामी देऊन सुरक्षित ठेवले गेले.

जेव्हा हिऱ्यास तिजोरीतून बाहेर काढले
आकाशने वर्ष २०१७ मध्ये पुन्हा या हिऱ्यास तिजोरीच्या बाहेर काढले आणि त्या हिऱ्यावर काहीतरी नवीन करण्याचा विचार त्याच्या मनात आला. त्यावेळीही नरेंद्र मोदीच पंतप्रधान होते. तेव्हा पंततप्रधान स्वच्छ भारत अभियान, डिजिटल इंडिया, बेटी बचाओ-बेटी पढाओ अशा अनेक देशाच्या कामात गुंतले होते. या कामांमुळे प्रभावित होऊन आकाशने पंतप्रधानांची आकृती या हिर्‍यामध्ये कोरण्याचे ठरवले. मग लेझर चालू झाला आणि एका महिन्याच्या अथक परिश्रमानंतर या हिऱ्यावर पंतप्रधान मोदींचा आकार दिसू लागला.

 

१०-१२ वेळेस काचेवर सराव केला
आकाशने आधी नकाशा आणि मोदींची आकृती काचेवर तयार केली. आकाशने सांगितले की, पहिल्यांदा डायमंडला भारताच्या नकाशाचा आकार द्यायचा होता तेव्हा त्याने काचेवर १०-१२ वेळेस लेझरने काम केले होते. त्यात त्याला यश मिळाल्यानंतर त्याने डायमंडवर काम सुरू केले होते. १.४६ कॅरेट हिऱ्याच्या आत लेझर इंस्क्रिप्शनने आकृती काढणे इतके सोपे नव्हते, परंतु शांत मनाने आणि चिकाटीने कठीण परिश्रम घेऊन हे काम यशस्वी झाले.

यामागचे कारण असे होते की जर व्होल्टेज आणि डेप्थमध्ये एक बिंदू जरी जास्त झाला असता तर पूर्ण हिराच फुटण्याची शक्यता होती. आता या कामात आकाशला यश मिळालं आहे. त्याला हा हिरा मोदी यांना भेट करायचा आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/