युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षाकडून युवकाचा खून

तासगाव : पोलीसनामा ऑनलाईन

युवक राष्ट्रवादीचे तासगाव तालुकाध्यक्ष राजेश पाटीलने गावातील राजेश फाळके यांच्यावर मंगळवारी रात्री खुनी हल्ला केला होता. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजेश फाळके यांचा गुरुवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सन २०१७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत फाळके आणि त्यांच्या मित्रांनी मदत केली नसल्याच्या रागातून राजेश पाटील याने हे कृत्य केले असल्याची माहिती समोर येत आहे.

[amazon_link asins=’B01JIRKTPQ,B01LWJ2J8G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’45fc083c-b182-11e8-b29f-2dfbcd0deed5′]

मंगळवारी राजेश पाटीलने ग्रामपंचायत निवडणूकीत फाळके यांना तुमचे लोक आमच्या मागे का उभा राहीले नाहीत असा जाब विचारत राजेश फाळकेला लाथा – बुक्क्यांनी जबर मारहाण केली. मारहाणीत बरगड्या मोडल्याने राजेश फाळके गंभीर जखमी झाले होते. त्यांना  उपचारासाठी मिरज येथील रुग्णालयात दाखल केले असता गुरुवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सांगली : खुनाचा प्रयत्न करणाऱ्या फरारी संशयिताला अटक

जाहिरात

बुधवारी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला होता. बुधवारी राजेश पाटीलच्या विरोधात अॅट्राॅसिटी व खूनी हल्ला केलेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश फाळके यांच्या मृत्यू नंतर राजेश पाटील याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे तासगावचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी सांगितले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सांगली : तलवार दाखवून दहशत माजविणाऱ्यास अटक