खळबळजनक ! ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून युवकाचा पार्टीतच केला खून

दिग्रस/यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – राहटी येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर एक पार्टी ठेवण्यात आली. त्या पार्टीतच एका युवकाचा खून करण्यात आला. कोंडबा लक्ष्मण हटकर (३४) रा. राहटी असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री ८ च्या दरम्यान कोंडबा याला जखमी अवस्थेत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला.तसे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

तर बुधवारी राहटी येथे मतमोजणीनंतर नारायण गव्हाणे यांचा विजय झाल्याबद्दल एका शेतात पार्टी ठेवण्यात आली होती. कोंडबा त्या पार्टीला जातो असे सांगून दुपारीच घरातून निघून गेला. तो पार्टीत पोहोचल्यानंतर जेवण करत असताना पुढे बसलेल्या विश्वास गव्हाणे याने कोंडबाशी तू आम्हाला मतदान केले नाही, तु जेवायला कसा आला यावरून त्यांच्या दोघात वाद झाला. वाद सुरू असतानाच विश्वासने कोंडबाच्या छातीवर सुरा फेकून मारला. यात कोंडबा रक्तपात होऊन कोसळला. त्यानंतर त्याला जवळच एका ग्रामीण रुग्णालयात नेले होते. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

या दरम्यान, गुरुवारी कोंडबाच्या कुटुंबांनी पोलीस ठाण्यात जाऊन कोंडबाचा खून झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तत्पूर्वी बुधवारी रात्रीच विश्वास गव्हाणे याला ताब्यात घेऊन भादंवि कलम ३०२, ५०४ यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळपासून कोंडबाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात ठिय्या देत सर्व आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेहाची उत्तरीय तपासणी करू देणार नाही, अशी भूमिका घेतली. यावेळी राहटी गावातील काही लोकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. यामुळे तेथे तणाव निर्माण झाला होता. तसेच कोंडबाच्या कुटुंबीयांनी दिग्रस येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आणि ठाण्यात लोंकांचा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी यवतमाळ येथून राखीव पोलीस दलालाबोलावण्यात आले. त्याक्षणी उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल तेथे दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनात सोनाजी आमले पुढील तपास करीत आहे.