प्रेयसीच्या खूनानंतर ‘WhatsApp’वर स्टेटस ठेऊन युवकाची आत्महत्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – मावळ तालुक्यातील वडगाव येथील निसर्गवारा लॉजवर दोन दिवसांपूर्वी आपल्या प्रेयसीचा खून करून फरार झाल्याने आरोपीने आत्महत्या केली आहे. या तरुणाचे नाव श्रीराम गिरी असे असून त्याने इंद्रायणी नदीत उडी घेत आत्महत्या केली. त्याआधी त्याने व्हॉट्सअप स्टेटस ठेवले होते. यामध्ये आपले पहिलं आणि अखेरचं प्रेम संपलं असून आपण या जगाचा निरोप घेत असल्याचे स्टेटस त्याने ठेवले होते. आत्महत्येनंतर त्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी श्रीराम सुग्रीव गिरी हा आपल्या प्रेयसीसह वडगाव मावळ येथील एका लॉजवर थांबले होते. यावेळी त्या दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले. त्यानंतर त्याने प्रेयसीवर ब्लेडने वार करत तिचा खून केला. त्यावेळी त्याने त्या ठिकाणाहून पळ काढला होता.

इंद्रायणी काठी सापडली आरोपीची दुचाकी

आरोपी हत्या करून फरार झाल्यानंतर त्याच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांनी पथके देखील तैनात केली होती. मात्र त्याचा शोध घेत असताना पोलिसांना त्याची दुचाकी इंद्रायणी नदीकाठी आढळून आली होती. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी देखील व्यक्त केला होता.