अक्षय आढळराव युवा मंचच्या वतीने दोन हजार कुटुंबांना धान्यसाठा

पुणे : प्रतिनिधी – शिवसेनेच्या सर्वच कार्यकर्त्यांनी शिरूर मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये अक्षय आढळराव युवा मंचच्या वतीने दोन हजार कुटुंबांना धान्यसाठा पुरविला आहे. चाकण, राजगुरूनगर, शिरूर आदी ठिकाणी शिवसेनेच्या शाखा आहे, त्या ठिकाणी अन्नछत्र सुरू केले आहे. संकटाच्या काळामध्ये नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेना धावून येते, असे माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

महंमदवाडी-कौसरबाग (प्रभाग क्र.26) येथील स्थानिक नगरसेविका प्राची आल्हाट यांनी स्वखर्चातून मेडिकल, पोलीस अधिकारी-कर्मचारी, टँकरचालक, स्वच्छता दूत, खासगी हॉस्पिटल आणि क्लीनिकमधील डॉक्टर्स, नर्स, पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी, टँकरचालकांना फेसशिल्ड, हॅंडग्लोज, सेनिटायझर, तसेच डॉक्टरांना पीपीई कीट, प्रभागातील चेक नाक्यावरील पोलिसांना टेम्पेचर मशीन माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे, पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे, जोगदंड, भोंडवे, लवटे, पुंडे, जाधव, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त सुनील यादव, घनवट, आरोग्य निरीक्षक नवनाथ शेलार, सुनील बावकर, सरकारी टॅंकर पॉईंटवरील मुकादम हांडे, हरपळे, बडंबे रायकर, पांगारे, हडपसर मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मंगेश वाघ आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरसेविका प्राची आल्हाट म्हणाल्या की, देशभर लॉकडाऊन असल्यामुळे उद्योग, व्यवसाय आणि कंपन्या बंद असून हाताला काम नाही. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना अन्नदान आणि धान्य वाटप, तसेच कोरोना व्हायरसपासून बचावासाठीचे साहित्य देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांनीही त्यांच्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात, त्या सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.