पुणे : मुलीकडे का पाहतो विचारणाऱ्याचा कोयत्याने सपासप वार करुन निर्घुण खुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुलीकडे का पहातो, असे विचारल्यावरुन झालेल्या वादात एका तरुणावर ७ ते ८ जणांनी कोयता, कुऱ्हाडीने वार करुन त्याचा निर्घुण खुन केला. ही घटना येरवडा येथील मच्छी मार्केटमध्ये मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. आदर्श काकडे (वय २४, रा. येरवडा) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत येरवडा पोलिसांनी ७ ते८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, आदर्श काकडे याचे त्यांच्या शेजारच्याशी घराच्या बांधकामावरुन वाद होता. त्यात त्याच्या मामाच्या मुलीची शेजारचा मुलगा छेडछाड करत होता. हे समजल्यावर काकडे त्याने त्याला जाब विचारल्याने त्यांच्यात काल वाद झाला होता. त्यानंतर मध्यरात्री आदर्श काकडे हा मच्छी मार्केट येथे असताना ७ ते ८ जणांनी त्याच्यावर हल्ला केला.

त्यांनी कोयता, कुऱ्हाडीने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आदर्शचा जागीच मृत्यु झाला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा तपास सुरु आहे.

सुंदर आणि ग्लोइंग त्वचा हवीये.. ‘या’ टिप्स वापरून घरी पण घेऊ शकता स्पा

वजन कमी करण्यासाठी खा ‘ही’ फळभाजी

पोटाच्या समस्या कधीच होणार नाहीत, जर सांभाळल्या ‘या’ आठ गोष्टी

ऑफिसमध्ये बसूनही करता येतील व्यायामाचे हे प्रकार