दहीहंडी फ्लेक्स लावण्यावरून तरुणाचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

शहर फ्लेक्सने विद्रुप होत असताना सिंहगड भागात दहिहंडीचे फ्लेक्स लावण्यावरून एकाच भागातील तरुणांमध्ये झालेल्या वादातून 5 जणांनी एकावर तलवारीने वार करून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री ही घटना माणिकबाग परिसरात घडली.

[amazon_link asins=’B0785JJF7L,B07D9G1GHB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’03bc1f2b-ad96-11e8-9d9e-dbac9a28bf94′]

अक्षय गडशी (वय 23, नॅशनल पार्क सोसायटी, माणिकबाग) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी निलेश चौधरी, सागर दारवडकर व त्यांच्या 3 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

अक्षय आणि आरोपी एकाच भागातील आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी आरोपी व अक्षय यांच्यात दहीहंडीचा फ्लेक्स लावण्यावरून वाद झाला होता. त्या वादातून 5 जणांच्या टोळक्याने मध्यरात्री माणिकबाग येथील पेट्रोल पंपासमोर अक्षयला गाठून त्याच्यावर तलवारीने वार करून खून केला.

शहरात दहीहंडी मंडळाकडून मोठ-मोठे शुभेच्छा व आयोजीत कार्यक्रमाचे फ्लेक्स लावले जातात आहेत. त्यातून दोन गटात किरकोळ वादही होत आहेत. मात्र, शनिवारी मध्यरात्री सिंहगड भागात याच वादातून तरुणाचा खून करण्यात आला आहे.

राष्ट्रसंत तरुण सागरजी महाराज यांचे निधन