धक्कादायक ! गर्लफ्रेन्डला हवा होता मोबाइल, बॉयफ्रेन्डने केली मित्राची हत्या अन् मिळवला फोन आणि…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका बेरोजगार तरुणाने गर्लफ्रेन्डची मोबाईलची मागणी पूर्ण करण्यासाठी चक्क मित्राची हत्या केली आहे. उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यातील सैया भागात ही विचित्र घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

जितेंद्र (रा. चमरपूर डांग घियावली धौलपूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मोनू आणि सुमित (पूर्ण नाव समजू शकले नाही) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आग्र्याच्या सैया भागात 6 जानेवारीला शेतात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी तपास केल्यावर त्याच नाव जितेंद्र असल्याचे समोर आले. पोलिसांनी जेव्हा पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला तेंव्हा समोर आले की, त्याची हत्या त्याचाच मित्र मोनूने केली होती. मोनूच्या गर्लफ्रेन्डने त्याच्यामागे मोबाइल फोन घेऊन देण्याचा तगादा लावला होता. मोनू हा बेरोजगार होता त्यामुळे तो गर्लफ्रेन्डची मोबाइलची मागणी पूर्ण करू शकत नव्हता. नंतर आरोपी मोनूने गर्लफ्रेन्डला मोबाइल देण्यासाठी एक प्लॅन तयार केला. मोनूचा मित्र जितेंद्रकडे स्मार्टफोन होता आणि मोनूला जितेंद्रचा मोबाइल घ्यायचा होता. यासाठी मोनूने आणखी एकाला सोबत घेतले आणि जितेंद्रला घेऊन एके ठिकाणी गेले. मोनू आणि त्याच्या साथीदाराने जितेंद्रला पकडल आणि शर्टने त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर त्यांनी मृतकाच्या नाका-तोंडात मातीही टाकली. जेव्हा जितेंद्र मृत झाल्याची खात्री पटली तेव्हा मोनूने त्याचा मोबाइल घेतला आणि साथीदारासोबत पळ काढला. पोलिसांनी मोनू आणि त्याच्या साथीदाराला अटक करून तुरूंगात डांबल आहे.

मृत जितेंद्र चमरपूर डांग घियावली धौलपूर येथे राहणारा होता. तो सैयामध्ये त्याच्या बहिणीच्या घरी आला होता. पाच जानेवारीला बहिणीच्या घरून निघाल्यावर तो गायब झाला होता. त्यानंतर परिवाराने तो हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली. ही हत्या इमली बस्तीमध्ये राहणाऱ्या मोनू आणि सुमितने केली असून दोघांना अटक केल्याचे एसएसपी बबलू कुमार यांनी सांगितले.