कॅम्पमध्ये सपासप वार करुन तरुणाचा खुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – किरकोळ कारणावरुन तरुणावर धारधार शस्त्राने वार करुन त्याचा खुन करण्याचा प्रकार सोमवारी रात्री कॅम्पमध्ये घडला. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना कॅम्प एज्युकेशनच्या मागील बाजूला असलेल्या कॅनॉलच्या कडेला सोमवारी सायंकाळी घडली.

किसन सुरेश नुय्या (वय २७, रा. सर्व्हेट क्वार्टर, स्वारगेट) असे अटक केलेल्याचे नाव असून महमंद असे खुन झालेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, किसन नुय्या हा सफाईचे काम करतो. काल रात्री नाल्याजवळ एकाचा मृतदेह पडला असल्याची माहिती लष्कर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर एका ३० ते ३५ वर्षाच्या तरुणाच्या अंगावर धारधार शस्त्राने वार करुन खुन केल्याचे दिसून येत होते. मात्र, या तरुणाची ओळख पटली नव्हती. या भागात पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यावेळी तेथे किसन हा त्या ठिकाणी घुटमळत असल्याचे लोकांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपणच त्याला मारल्याची कबुली दिली. महमंद हा त्याच्या पत्नीला फोन करत असल्याने रागातून आपण त्याचा खुन केल्याचे किसन सांगत आहे.

महमंद याची अधिक माहिती पोलीस घेत आहेत.

‘त्या’ तरुणाच्या खुनातील ४ आरोपी अटकेत 

Loading...
You might also like