कोयत्याने सपासप वार करुन युवकाचा खून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शिर्डी येथील मंगेश पाईक या युवकाचा मध्यरात्री खून करण्यात आला. जुन्या भांडणातून हा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पाईक यांचे शिर्डी परिसरातील काही युवकांसोबत वाद होते. या वादातूनच मंगळवारी रात्री उशिरा मंगेश पाईक यांच्यावर जुन्या वादातून काही लोकांनी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन मंगेश पाईक यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत जवळपास सर्व नऊ आरोपींना रात्रीच ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला नाही. पोलिसांकडून खूनाचा सखोल तपास सुरू आहे. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.