ग्राहक म्हणून आलेल्या तरुणाचा ‘बुधवार पेठे’त खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील बुधवार पेठेत ग्राहक म्हणून आलेल्या तरुणाने लग्नाचा आग्रह धरून कामात अडथळा आणत असल्याच्या कारणावरून त्याचा खून केला. ही घटना गुरुवारी (दि.२७) घडली. शवविच्छेदन अहवालानुसार तरुणाला बेदम मारहाण करुन खून करण्यात आला असल्याचे उघड झाले. यानंतर फरासखाना पोलिसांनी दोन देवदासींना अटक केली.

बुद्धिश्य मसोई मगर (वय २१) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. उर्मिला जगदिशचंद्र पटेल (वय ५८) सुनिता गोपाल तमांग (वय २६ दोघे रा. माचिस बिल्डिंग, बुधवार पेठ मुळ रा. नेपाळ) यांना अटक केली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यातील महिला सहायक पोलीस निरीक्षक खेतमाळीस यांनी फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आणि आरोपी हे मुळचे नेपाळचे राहणारे आहे. मयत तरुण हा हॉटेलमध्ये काम करत होता. तो आरोपींकडे सारखा येत होता. त्याने सुनिताकडे लग्न करण्याचा तगादा लावला होता. तिने त्याला प्रतिसाद दिला. तिला एक मुलगी आहे मात्र त्यानंतर तिने त्याला विरोध केला. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होत होते. तसेच तो सुनिताला काम करू देत नव्हता. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास मगर तिच्याकडे आला होता. त्यावेळी त्यांच्यात वाद झाले. आरोपींनी मगरला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याचा गळा आवळला.

गुन्ह्यात गोवले जाऊ नये यासाठी त्यांनी शुक्रवार पेठ पोलीस चौकीत एक तरुण बेशुद्ध पडल्याची माहिती दिली. पोलिसांना मगरला ससुन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याला मृत घोषीत करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात गळा दाबून खून केला असल्याचे निष्पन्न झाले. या अहवालानुसार फरासखाना पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करून दोघींना अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) एन.एम. शेळके करीत आहेत.

मल्हार सेना आपणास महाराष्ट्रात फिरू देणार नाही : राष्ट्रवादी’च्या प्रदेशध्यक्षांना इशारा

मागास वर्गीय विद्यार्थ्यांचा भोजन व निवासाचा खर्च शासन उचलणार

‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा