कॅम्पात तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नारळ विक्रेत्या तरुणाचा कोयच्याने वार करून तिघांनी खून केल्याची घटना कॅम्पातील कृष्णा नगर परिसरात शनिवारी रात्री घडली. संबंधित तरुणाने तरुणीशी विवाह केला होता. तो मान्य नसल्याने तरुणीच्या भावानेच त्याचा खून केला.

सुलतान मैनू सैय्यद (२५, लुल्लानगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अरबाज शेख व त्याच्या साथीदारांवर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैय्यद हा कॅम्पातील महात्मा गांधी रस्त्यावरील वंडर लँड इमारतीजवळ शहाळे विक्री करतो. वर्षभरापूर्वी त्याने एका तरुणीशी विवाह केला होता. तिच्या नातेवाईकांना तिचे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे तिचा भाऊ अरबाज शेख याने शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सैय्यद याच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर त्याने घाबरून पळ काढला. गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने परिसरात बराच काळ घबराट पसरली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी जखमी सय्यदला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मातर् त्याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. पोलिसांकडून मारेकऱ्याचा शोध सुरु आहे.

You might also like