महिलेवर बलात्कार करत पतीला सांगितल्यास लहान मुलीवरही बलात्काराची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एका ज्वेलर्समध्ये काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार करत एका तरुणाने हा प्रकार नवऱ्याला सांगितला तर मुलीवरही बलात्कार करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी त्याच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३० वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार शुभम पाटील (वय २५, रा. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही हडपसर परिसरात एका ज्वेलर्सच्या दुकानात काम करते. दरम्यान तिची ओळख शुभम पाटीलशी झाली. त्यानंतर त्याने तिला तू मला खुप आवडतेस. माझ्या सोबतच राहा असे म्हणत तिच्यावर शेवाळवाडी येथील एका फ्लॅटमध्ये नेऊन बलात्कार केला.

हा प्रकार २०१३ पासून सुरुहोता. त्यानंतर त्याने तिला धमकावण्यास सुरुवात केली. हा प्रकार पतीला सांगितला तर तुझ्या लहान मुलीला पळवून नेईल आणि तिच्यासोबतही हा प्रकार करेन अशी धमकी दिली. त्यानंतर महिलेने यासंदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

You might also like