अविश्वसनीय ! ‘मॉब लिंचिंग’मध्ये मारला गेला, ‘श्राद्ध’ घातल्यानंतर जिवंत ‘घरी’ परतला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमध्ये पटना येथे एक प्रकरण घडले. येथे मॉब लिंचिंगमध्ये मारला गेलेला एक व्यक्ती पुन्हा परतला आहे. या व्यक्तीला जमावाने चोर समजून मारले होते. आता या व्यक्तीला पाहून पोलीस देखील थक्क झाले. ही घटना 10 ऑगस्टची आहे. पटना नौबतपूरच्या महमदपुर गावात जमावाने कृष्णा मांझीला मुलं चोरत असल्याचे समजून मारले होते, एवढेच नाही तर पोलिसांनी मॉब लिंचिंगच्या हत्येची केस देखील दाखल करु 23 आरोपींना तुरुंगात धडले होते.

व्यक्तीच्या पत्नीने सांगितले की पोलिसांनी तिला एक मृतदेह दाखवून सांगितले की चेहरा स्पष्ट दिसत नाही परंतू हा तुमचा पती आहे. पोलिसांनी सांगितल्यावर ती मृतदेह घेऊन निघून गेली आणि कर्ज घेऊन पतीचे श्राद्ध घातले.
मॉब लिंचिंग में 'मारा गया' था शख्स, श्राद्ध के बाद वापस लौटा
आता नौबतपूर पोलीस ठाण्यात पोलीस स्पष्टीकरण देत आहे की कृष्णा जिवंत परतला त्या दोघांच्या हातावर गोंदवलेले होते आणि त्यावर कृष्णा मांझी लिहिले होते. तर एसपीने सांगितले की जो कृष्णा जिवंत आहे त्याच्या हातावर गोंदवलेले नाही.

कृष्णा परत आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला की मग तो कृष्णा मांझी कोण होता जो मॉब लिंचिंगमध्ये मारला गेला आणि ज्याला जमावाने मारले. मसौढीमध्ये काम करणारा कृष्णा जेव्हा गुरुवारी घरी आला तेव्हा तो म्हणाला की मी तर काम करण्यासाठी बाहेर गावी होतो. मला काय माहिती की माझ्याबाबत येथे काय झाले आहे. पोलीस आता पुढील तपास करत आहे.

Visit : Policenama.com