home page top 1

भाजपचा पराभव करेल अशा उमेदवारास युवक क्रांती दलाचा पाठिंबा !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करू शकेल अशा उमेदवाराला युवक क्रांती दल समर्थन देणार आहे. आजच(बुधवार दि 9 ऑक्टोबर 19) रोजी पु्ण्यात युवक क्रांती दलाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत तसा ठराव मंजूर करण्यात आला आहे. युवक क्रांती दलाने राज्यातील विधानसभा मतदारसंघांपैकी कोथरूड मतदारसंघात किशोर शिंदे आणि कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांना समर्थन जाहीर केले.

आज दुपारी किशोर शिंदे यांनी युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यांना मिळालेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी युवक क्रांती दलाचे आभार मानले. यावेळी प्रशांत कनोजिया, सुधीर धावडे, विनोद मोहिते, अमोल शिंदे, सचिन विप्र आणि इतर सहकारी उपस्थि होते.

युवक क्रांती दलाची आजची झालेली बैठक युवक क्रांती दलाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीत राज्य कार्यवाह संदीप बर्वे, राज्य संघटक जांबुवंत मनोहर, राज्य सहकार्यवाह आप्पा अनारसे, पुणे शहराध्यक्ष सचिन पांडुळे, पुणे शहर उपाध्यक्ष कमलाकर शेटे, पुणे शहर संघटक ऋतुजा पुकळे, अन्वर राजन, मुख्तार मणियार तसेच क्रांती दलाचे इतर सदस्य उपस्थित होते.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like