प्रियकराने दिली प्रेयसीसह तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी अन् …

बंगळुरू : वृत्तसंस्था – एका सनकी प्रियकराने गर्लफ्रेन्डसोबत ब्रेकअप झाल्याने तिला धडा शिकवण्यासाठी तिच्या दुचाकीला आग लावली. त्यानंतर तीला व तीच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबधित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

संजय असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडीत तरुणीने पोलिसात तक्रार दिली. पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले की, आरोपीने ब्रेकअपनंतर तिला जीवे मारण्याची धमकी तर दिलीच सोबतच तिच्या आईलाही जीवे मारण्याची धमकी दिली. वर्षभरापूर्वी तिच्या आईला दोघांच्या प्रेम प्रकरणाबाबत समजले होते. आईचा रिलेशनशिपला विरोध होता. त्यानंतर तिने बॉयफ्रेन्ड सोबतचे नाते तोडले होते. पीडित तरूणी म्हणाली की, तो ब्रेकअप झाल्यापासूनच तिला मेंटली टॉर्चर करत होता. गेल्या महिन्यात 12 जानेवारीला आरोपी तिच्या घरी येऊन तीला जीवे मारण्याची धमकी देऊन गेला होता. तसेच आरोपीने 2 जानेवारी रोजी घराबाहेर उभा केल्या तिच्या स्कुटीवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली.