TikTokवर बंदूक घेवुन व्हिडीओ काढताना सुटली ‘बुलेट’ अन् आयुष्याचा खेळ ‘खल्‍लास’

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – तरुणांना वेड लावणा-या टिकटॉकमुळे अनेकांना गंभीर समस्येला सामोरे जावे लागले आहे. टिकटॉकचा हा जीवघेणा नाद एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. शिर्डीमध्ये एक तरुण हातात बंदूक घेून टिकटॉकवर व्हिडीओ बनवत होता. व्हिडीओ बनवत असताना गोळी सुटल्याने तरुणाला जीव गमवावा लागला. प्रतीक वाडेकर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्रतिक वाडेकर हा त्याच्या काकांच्या तेराव्यासाठी शिर्डीमध्ये आला होता. प्रतिक आणि त्याचे नातेवाईक शिर्डीमधील पावनधाम हॉटेलमध्ये टिकटॉकवर व्हिडीओ बनवत होते. त्यावेळी सनी पवार या तरुणाच्या हातातील गावठी कट्ट्यातून गोळी सुटली. ही गोळी प्रतिकच्या छातीत घुसली यात प्रतिक गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर चारजण घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून सनी पवार याचा शोध सुरु असून त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल कोठून आले आणि कशासाठी आणले होते, याचा उलघडा सनी पवार याला ताब्यात घेतल्यानंतर समजेल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, सोशल मीडियावर जरा हटके करण्याच्या नादात प्रतिक याचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

आनंदी, निरोगी जीवनासाठी करा ‘ध्यान’ ; टेन्शन, चिडचिड होईल दूर

मासिक पाळीत स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात ‘हे’ आजार !

मुलांच्या तजेलदार त्वचेसाठी काही ‘घरगुती’ उपाय

महिलांच्या आरोग्यावर गर्भनिरोधक गोळ्यांमुळे होऊ शकतात ‘हे’ घातक परिणाम !

Loading...
You might also like