दौंडमध्ये भरदिवसा तरुणावर गोळीबार, तरुण गंभीर जखमी

दौंड : ( अब्बास शेख ) पोलीसनामा ऑनलाइन –दौंड शहरामध्ये एका युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे या गोळीबारामध्ये रोहित रवी कांबळे हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने पुण्यातील खाजगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रोहित कांबळे याला दोन गोळ्या लागल्या असून एक गोळी त्याच्या पोटात तर दुसरी त्याच्या मांडीमध्ये घुसल्याचे समजत आहे. हा गोळीबार नेमका कुणी व कोणत्या कारणासाठी केला याबाबत अजून कुठलीही माहिती मिळाली नसून पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थती नियंत्रणात असल्याचे समजत आहे.

दौंड शहरात भरदिवसा गोळीबार झाल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह दौंड पोलिस ठाण्यातील कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तरूणावर कोणत्या कारणामुळं गोळीबार झाला याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही. गोळीबार करणार्‍यांचा शोध घेण्याचे काम चालु आहे.

 

Visit : Policenama.com

Loading...
You might also like