Video : सिने कलाकारांवर भाष्य करणाऱ्या रिहाना आणि मिया खलिफाला ‘या’ तरुणाने ‘धु-धु’ धुतले

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – गेल्या तीन महिन्यांपासून देशात शेतकरी आंदोलनाचा विषय चर्चिला जात आहे. सोशल मीडिययावरही आंदोलनावरून वातावरण चांगलेच तापले आहे. देशातीलंच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकांनीही या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. नुकतेच प्रसिद्ध पॉप स्टार रिहाना आणि मिया खलीफाने या आंदोलनाचे समर्थन करत काही सिने कलाकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होत. हे प्रकरण गरम असतानाच या प्रकरणावर एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मिया खलीफा आणि रिहानाला एक तरुण जबरदस्त धूताना दिसत आहे. त्याच्या या कृतीमुळे कित्येक लोक त्याचे फॅन झाले आहे. तर त्याचा हा व्हिडीओ ५७ हजारहून अधिक लोकांनी बघितला आहे.

 

 

 

शेतकरी आंदोलनावरून रिहाना आणि मिया खलिफा या दोघीनी काही सिने कलाकारांवरही प्रश्न उपस्थित केला होता. अक्षय कुमार, अजय देवगन, सुनील शेट्टी यांच्या नावाचा समावेश होता. याची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा झाली. या प्रकरणामध्ये एका युवकाने जबरदस्त एंट्री करत सर्वांचा धुवून टाकलं आहे. या तरुणाने खास अंदाजात मिया खलीफा आणि रिहानाला फटकारले आहे. एवढेच नाही, तर या तीनही स्टार्सवर कुणीही प्रश्न उपस्थित करू नये, असा इशाराही या तरुणाने दिला आहे. सोशल मीडियावर सध्या या व्हिडीओचाच बोलबाला सुरु आहे .तसेच या व्हिडिओवर जबरदस्त कमेंटदेखील येत आहेत. एका युझरने लिहिले आहे, ‘भाई जुबान केसरी खा के बोल’, ‘भावा, तू तर ट्विटरलाच हालवून टाकलं.’ आणखी एकाने लिहिले आहे, ‘नेक्स्ट लेवल भाई’. तर पाहूयात, लोकांनी या व्हिडिओवर काय-काय केल्यात कमेंट.