धक्‍कादायक ! तरूणाच्या पोटाचं ऑपरेशन करताना आतुन निघाल्या ‘या’ वस्तू, डॉक्टर ‘परेशान-हैराण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशातील छतरपुरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एक तरुण पोटदुखीमुळे दवाखान्यात गेला असता डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. या तपासणीत डॉक्टरांना हैराण करणारी माहिती समोर आली आहे.

यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करून या तरुणाच्या पोटातून लोखंडाची करवत, अनेक पेन, खोडरबर, चेंडू त्याचबरोबर पोते शिवण्यासाठी वापरण्यात येणारी सुई अशा लोखंडाच्या वस्तू बाहेर काढल्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशानगर भागात राहणाऱ्या योगेंद्र ठाकुर याच्या पोटात दुखत असल्याने तो दवाखाण्यात आला होता. त्यानंतर त्याचे सिटी स्कॅन केले असता त्याच्या पोटात काही लोखंडाच्या वस्तू आढळून आल्या. यावेळी त्यांनी रुग्णाला याविषयी विचारले असता त्याने मला लोखंडाच्या वस्तू खायची सवय असल्याचे डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनीत्याचे जवळपास दोन तास ऑपरेशन केले. त्यावेळी त्याच्या पोटातून मोठ्या प्रमाणात लोखंडी वस्तू काढल्या. त्याच्या भावाने सांगितले कि,त्याने करवत, ब्लेड यांसारख्या लोखंडी वस्तू खाल्ल्या आहेत.

दरम्यान, कुटुंबियांना या विषयी माहिती दिली असता त्यांचा यावर विश्वास बसला नाही. त्यानंतर त्याला डॉक्टरांकडे नेऊन त्याचे सिटी स्कॅन करण्यात आले. यामध्ये वस्तू आढळून आल्यानंतर घरच्यांचा या गोष्टीवर विश्वास बसला. याविषयी बोलताना डॉक्टरांनी सांगितले कि, माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा अशा प्रकारचे ऑपरेशन केले असून हा खूप वेगळा अनुभव होता.

‘या’ १० पैकी काही ‘एक’ खाल्ल्यास शरीरातील रक्‍ताचे (HB) प्रमाण वाढेल, जाणून घ्या

वैवाहिक जीवनात ‘हा’ आहार घ्या अन् घ्या सळसळत्या तारूण्याचा अनुभव, जाणून घ्या

चाळिशीनंतर ‘वजन’ नियंत्रणात आणण्यासाठी करा ‘हे’ ७ सोपे उपाय

‘या’ 2 उपायांमुळे कंबरदुखी होईल ‘गायब’, कधीही होणार नाही त्रास, जाणून घ्या

डोळयांमध्ये काही ‘बदल’ झाल्यास ‘ती’ १० पैकी ‘या’ एका आजाराची लक्षणं, जाणून घ्या

मेंदी अनेक आजारांवर गुणकारी, जाणून घ्या

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like