मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करत तरुणीची आत्महत्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – बॅंकेत क्रेडिट कार्ड मार्केटिंगचे काम करणा-या एका 25 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पाचगाव परिसरातील आर. के. नगरमध्ये बुधवारी (दि. 2) ही घटना घडली. विशेष म्हणजे तीने मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करून आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद केली आहे.

धनश्री अप्पा जाधव (वय 25) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धनश्री ही मूळची आजरा तालुक्यातील राहणारी होती. ती गेल्या दोन वर्षांपासून पोस्टल कॉलनी (आर. के. नगर) येथे रूम भाड्याने घेऊन राहत होती. ती सध्या एका बॅंकेत क्रेडिट कार्ड मार्केटिंगचे काम करीत होती. तिने गळफास लावून घेतल्याचे बुधवारी (दि. 2) रात्री उघडकीस आले. पोलिसांना एका डायरीत व चिठ्ठीत वैयक्तिक आयुष्य आणि भविष्याबद्दल लिहिलेला मजकूर सापडला आहे. पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर म्हणाले की, तीने आत्महत्येपूर्वी व्हिडिओ चित्रीकरण आणि व्हिडिओ कॉल केला होता.

You might also like