‘WhatsApp’वर ‘मिस यू भावांनो’, ‘भेटू परत’ असं स्टेटस ठेवून युवकाची आत्महत्या, सर्वत्र खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – व्हॉटस्अ‍ॅपवर ‘मिस यू भावांनो’ व ‘भेटू परत’ असं स्टेटस ठेवून युवकाने आत्महत्या केली. जामखेड तालुक्यातील जवळा येथे ही घटना घडली. अशोक संजय मते (वय 20) हे मयत युवकाचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, जवळा- करमाळा रस्त्याजवळ खंडोबा मंदिर परिसरातील शेतामध्ये लिंबाच्या झाडाला अशोक मते (वय 20) याचा मृतदेह गळफास घेतल्याच्या स्थितीत काल दुपारी आढळून आला. ग्रामस्थांनी तातडीने त्याला उपचारासाठी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकारी युवराज खराडे यांनी मते यांना मृत घोषित केले. याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अशोक मते याने गळफास घेऊन आत्महत्या का केली, याचे कारण पोलिसांना समजू शकले नाही. त्याच्या पाठीमागे आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. कबड्डी खेळण्याची त्याला आवड होती. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी व्हॉटसअ‍ॅपवर मित्रांना ‘मिस यू भावांनो’ व ‘भेटू परत; असा स्टेट्स ठेवला होता.

आरोग्यविषयक वृत्त –