धक्कादायक ! पोलिसांच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पोलिसांच्या हप्ता मागणीच्या त्रासाला कंटाळून एका हॉटेल व्यावसायिक युवकाने गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची घटना उल्हासनगरमध्ये उघडकिस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. यानंतर त्याच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त करत पोलीस ठाण्याच्या समोर धरणे आंदोलन केले आहे. तर पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला आहे.

सतीश खेडकर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांतही तक्रार देण्यात आली आहे.

सतिश हा हॉटेल व्यावसायिक आहे. पोलिसांकडून त्याला हप्त्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे त्याला पोलिसांकडून वारंवार त्रास दिला जात होता. त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचं तक्रारीत म्हटले आहे. तर त्याला कालही त्रास दिला गेल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं तक्रारीत म्हटले आहे. या सगळ्या प्रकराने संतप्त झालेल्या त्याच्या कुटुंबियांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या बाहेर धरणे आंदोलन केले असून मोठा जमावर पोलीस ठाण्यासमोर जमला आहे.