देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन

नवरात्रीनिमित्त नांदेड शहरापासून जवळच असणाऱ्या रत्नेश्वरी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या एका तरूणाचा कुंडात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रमेश नारायण गरुडकर (२०) असे मृत तरुणाचे नाव आहे. रमेश हा त्याच्या मित्रांसमवेत दर्शनसाठी गेला होता. कुंडातील पाण्याच्या खोलीचा त्यास अंदाज आला नाही. त्यातच कुंडातील गाळात तो अडकल्याने मित्रानांही त्यास वाचवता आले नाही. दोन तासांनी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ee489d17-d02a-11e8-92f8-d10afdb645c2′]

मृत रमेश हा एकूलता एक मुलगा होता. तसेच तो एका दुकानावर कामाला जात होता. परंतु, त्याचा देवीच्या पायथ्याशी असलेल्या कुंडात बुडून मृत्यू झाल्याने देवस्थान व चौफाळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लोहा तालुक्यातील वडेपुरीच्या डोंगरावर असलेल्या रत्नेश्वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी नांदेडच्या चौफाळा भागातील रमेश हा त्याच्या मित्रांसोबत गेला होता. दर्शन घेण्यापूर्वी तो मित्रांसमवेत मंदीर परिसरात असलेल्या प्राचीन कुंडात पोहण्यासाठी उतरला.

[amazon_link asins=’B07FCRL8ZK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’25078183-d02b-11e8-9f68-0b6dd3ba41ea’]

परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने तो कुंडाच्या तळाशी जाऊन गाळात फसल्याने त्याचा मृत्यू झाला. मित्रांनी बाहेर येऊन उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना व गोदा जीवरक्षक दलाच्या जवानाना सांगितले. सकाळी ९ वाजता ही घटना घडली त्यानंतर जीवरक्षक जवानांनी तब्बल २ तासांनी त्याला बाहेर काढले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.