दुबईतून पाकिस्तानमार्गे आलेल्या युवकास दिल्ली विमानतळावरून अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमधील एका संघटनेशी संपर्क साधून देशद्रोहाचा कट रचणा-या तरुणावर गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यानंतर तो आरोपी दुबईहून पाकिस्तानात पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मात्र तो परत दुबईहून पाकिस्तानमार्गे दिल्ली विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी अटक केली आहे.

विकास वर्मा उर्फ मोहम्मद विकास (रा. भैन्सवाल) असे देशद्रोहाच्या नावाखाली अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी विकास वर्मा उर्फ मोहम्मद विकास हा संबंधित पोलीस ठाण्याच्या सेक्टर -10 स्थित वर्धमान गार्डनिया येथील राहत असून तो परदेशातील व्यक्तीच्या संपर्कात असून तो देशद्रोहाचा कट रचत असल्याची माहिती मिळाली होती. तसेच पाकिस्तानमधील जमावाशी त्याचा संपर्क झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेणे सुरु केले होते.

मात्र त्यावेळी तो दुबईहून पाकिस्तानात गेला आहे. तेथे त्याने एका पाकिस्तानी मुलीशी लग्न केले. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक गुंतले होते. दरम्यान, आरोपी दिल्ली विमानतळावर येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. दिल्ली विमानतळावर पोहोचताच त्याला सोनिपत पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी आयपीसी कलम १२४ अ आणि 153 ब अन्वये अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी त्याला रिमांडवर घेतले आहे. पाकिस्तानमधील संघटनेशी त्याच्या संपर्कांची माहिती संकलित केली जाईल. पोलिसांनी आरोपीला सात दिवसांचा रिमांड सुनावला आहे.

पाकिस्तानी महिलेशी लग्न केले
अटक आरोपीने फेसबुकवरील मैत्रीनंतर एका पाकिस्तानी महिलेशी लग्न केले, त्यामुळे शंका आणखी वाढली. आरोपीने बारावीपर्यंत शिक्षण घेतले असून त्याला संगणकाचे चांगले ज्ञान असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, त्याने बंदी घातलेल्या संघटनेचा मेसेज पुढे पाठविला होता, त्यामुळे तो त्या संस्थेच्या समूहात सामील झाला. त्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत होते.

याबाबत सोनीपतचे पोलीस अधिक्षक जश्नदीप सिंह रंधावा म्हणाले की, सेक्टर -10 भागात राहणाऱ्या तरूणाचा पाकिस्तानमधील एका बंदी घातलेल्या संस्थेशी संपर्क असल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये आरोपीवर कारवाई केली आहे. त्याला रिमांडवर घेण्यात आले आहे. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर या प्रकरणावर शिक्कामोर्तब होईल. चौकशीत विदेशात त्याच्याशी संपर्क साधण्यामागील कारणे देखील निश्चित केली जातील. त्याच वेळी, तो इतर कोणकोणत्या व्यक्तींशी संपर्कात होता याचा शोध घेतला जाईल.