वाळूचा अवैध उपसा करताना ढिगाऱ्याखाली दबून युवकाचा मृत्यू

भोकरदन (जालना) : पोलीसनामा ऑनलाइन – अवैध वाळूचा उपसा करताना ढिगाऱ्याखाली दबल्याने एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी दहाच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील चोऱ्हाळा येथे घडली. मागील काही दिवसापासून अवैध वाळू उपसा करताना झालेल्या घटनांमधील हा चौथा बळी आहे. ऋषिकेश कैलास पाचरणे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९ ते १० दरम्यान चोऱ्हाळा येथील ऋषिकेश हा ट्रॅक्टर चालक संदिप पाचरणे व इतर तीन जणांसोबत लिंगेवाडी येथील नदी पात्रात वाळूचा अवैध उपसा करण्यासाठी गेले होते. नदी पात्रातील भूयारामधून वाळूचा उपसा करत असताना ऋषीकेशच्या अंगावर अचानक वाळूचा ढिगारा कोसळला. वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने ऋषीकेशचा गुदरमरून मृत्यू झाला. याप्रकरणात अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

तालुक्यात यापूर्वी अवैध वाळूचा उपसा करताना गोळुक येथे दोन तर कोदोली परिसरात एक जणांचा मृत्यू झाला होता. आज ऋषिकेशचा चौथा बळी ठरला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like