विश्रांतवाडी आणि निगडी मध्ये २ युवकांचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

निगडी मिलींदनगर येथे राहते घरात एका तरुणाच्या डोक्यात सीमेंटचा गट्टू घालून खून करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला आहे. तुकाराम गुरपा शिंदे (२२, रा. मिलिंदनगर, निगडी) या तरुणाचा खून झाला आहे. तर भाऊ सुरेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  हा प्रकार निगडी पोलिसांना सकाळी आठच्या सुमारास समजला असून पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a341d906-c9e7-11e8-86c9-e39ab742c5cf’]

निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुकाराम आणि त्याचा भाऊ सुरेश हे दोघे मिलिंदनगर येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. शनिवारी रात्री कामावरून घरी आल्यानंतर नेहमी प्रमाणे दोघे झोपले होते. दरम्यान पहाटेच्या वेळी अज्ञात व्यक्तीने दोघा भावांवर हल्ला  केला. डोक्यात सीमेंटचे गट्टू टाकले आहेत. हा प्रकार सकाळी समजताच निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांना रुग्णालयात दाखल केले असता तुकाराम याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी घोषित केले. तर भाऊ जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ला, खून कोणी आणि का केला याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखा पथक तपास करत आहेत.

सनी कांबळे  खून प्रकरण : पोलिसांचा टवाळखोरांना चोप

विश्रांतवाडीमध्ये तरुणाचा खून

विश्रांतवाडी येथील मछि मार्केटमध्ये तरुणाची घातक शश्त्राने वारकरुन निर्घून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, हल्लेखोरांबाबात अद्याप माहिती कळू शकलेली नाही. अनिल धोत्रे (वय 37, विश्रांतवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मछी मार्केटमधील शेलार घाट या ठिकाणी एकव्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पड्ला असल्याची माहिती मिळाली.त्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी धाव घेतली. त्यावेळी हा घोत्र्रे असल्याचे समजले. दरम्यान त्याच्या चेहर्यावर घातक शश्त्राने सपासप वार केले आहेत. दोन पेक्षा जास्त आरोपी असल्याची माहिती मिळाली असुन, आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान हा प्रकार पुर्ववैंमन्यासातुन घडला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

[amazon_link asins=’B00JZHO0O6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6628faf7-c9e7-11e8-99b8-e179ea1caa74′]