उपराजधानीत जळत्या चितेवर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – जळत्या चितेवर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये घडली असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहीती मिळताच नागपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख अद्याप पटू शकली नाही. मात्र हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

आत्महत्या करणारा तरुण स्मशानभूमीशेजारी राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे. नागपूरच्या जयताळा स्मशानभूमीत ही घटना घडली असून जळीत प्रेत व आत्महत्या करणा-या तरुणाचा कोणताही संबंध नसल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांकडून आत्महत्या करणा-या तरुणाची ओळख पटवण्याचे आणि त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

Loading...
You might also like