‘राष्ट्रध्वजा’विरोधात बोलणाऱ्या महेबूबा मुफ्तींच्य PDP च्या कर्यकर्त्यांनी फडकवला तिरंगा

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या (PDP) प्रमुख मेहबूबा मुफ्ती (mahebuba mufti) यांनी तिरंग्याबाबत (national flag) केलेल्या वक्तव्यामुळे मोठं वादंग निर्माण झालं आहे. दरम्यान, श्रीनगरमध्ये पीडीपीच्या कार्यालयावर काही तरुणांनी तिरंगा (tiranga) फडकवला आहे. तसेच जम्मूमधील (Jammu) पीडीपीच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप पीडीपीच्या नेत्यांनी केला आहे.

पीडीपीचे नेते फिर्दोस तक यांनी ट्विट करुन हल्ल्याबाबत माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, पीडीपीच्या जम्मू काश्मीरमधील कार्यालयावर हल्ला करण्यात आला. काही आक्रमक राष्ट्रवादी तरुण कार्यालयात घुसले. त्यांनी माझ्यावरही हल्ला केला.

फिर्दोस पुढे म्हणाले, जमाव आमच्या ऑफिसमध्ये घुसला. त्यांनी काही जाणांना मारहाण केली. ते कार्यालयावर तिरंगा फडकवण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी आमच्याबाबत काही अपशब्दही उच्चारले. त्यांची ओळख पटू शकली नाही. पण ते उजव्या विचारांच्या संघटनांशी संबंधित लोक होते.

काय म्हणाल्या होत्या मुफ्ती

जम्मी-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी शुक्रवारी वादग्रस्त विधान केले होते. आम्हाला आमचा जम्मू-काश्मीर ध्वज परत मिळेपर्यंत तिरंगा ध्वज हाती धरणार नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. शुक्रवारी मेहबूबा मुफ्ती यांनी श्रीनगर येथे पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा देश, दोन ध्वजांचे राजकारण पुढे केले होते. सुरुवातीला त्या म्हणाल्या, आम्ही कलम 370 पुन्हा आणणारच आणि असे होईपर्यंत मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. त्यासोबतच मेहबुबा यांनी भारताच्या राष्ट्रीय ध्वजाबद्दल अपमानास्पद भाष्य केले. जेव्हा आमचा जम्मू काश्मीरचा झेंडा परत येईल तेव्हा आम्ही तो (तिरंगा) ध्वजही घेऊ. तो ध्वज आमच्या आयुष्याचा एक भाग आहे, तो आमचा ध्वज आहे. या ध्वजासोबत आमचं नातं आहे, असे मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या होत्या.

You might also like