भारतात YouTube च्या व्ह्यूअर्समध्ये वाढ, मागील वर्षापासून 45% पेक्षा जास्त लोकांनी टीव्हीवर पाहिले यूट्यूब

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  YouTube | जगातील सर्वात प्रचलित आणि लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूब (YouTube) ने म्हटले की, भारतात यावर्षी मे महिन्यात दोन कोटीपेक्षा जास्त लोकांनी आपल्या टीव्ही स्क्रीनवर यूट्यूब पाहिले, जे मागील वर्षीच्या तुलनेत 45 टक्के जास्त आहे. गुगल (Google) च्या मालकीच्या या प्लॅटफॉर्मने हे सुद्धा सांगितले की, यूट्यूबच्या प्रेक्षकांच्या संख्येला हिंदी, तमिळ, तेलुगु आणि इतर भाषांमध्ये कंटेट पाहणे आवडते.

गुगल इंडिया कंट्री मॅनेजर आणि व्हाईस प्रेसिडेंट संजय गुप्ता यांनी म्हटले,
अगोदरच दोन कोटीपेक्षा असे ग्राहक आहेत, जे कनेक्टेड टीव्हीवर कंटेट पहात आहेत.
यासाठी कंटेटचा वापर, साहित्याची विविधता, कंटेट प्रोड्यूसरची ही क्रांती केवळ मोबाइल फोन पुरतीच मर्यादित नाही.
ही एक अशी घटना आहे, जी मोबाइल फोन आणि कनेक्टेड टीव्ही, दोन्हीवर घडत आहे.

डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी प्रतिबद्ध

त्यांनी म्हटले की, गुगल भारताला एक अग्रगण्य डिजिटल अर्थव्यवस्था बनवण्यात मदत करण्यासाठी
प्रतिबद्ध आहे आणि यूट्यूब आणि डिजिटल व्हिडिओ या प्रवासाला आकार देण्यात खूप महत्वाची भूमिका पार पाडतील.

कोविड-19 च्या नंतर यूट्यूबचा जास्त वापर

यूट्यूब पार्टनरशिपचे डायरेक्टर सत्य राघवन यांनी म्हटले की, मोठ्या संख्येने ग्राहक विश्वासार्ह कंटेंट/माहितीच्या स्त्रोतांसाठी आणि नवीन कौशल्य शिकण्यासाठी व्हिडिओचा वापर करत आहे.
राघवन यांनी म्हटले की, भारतात 85 टक्के व्हिडिओ प्रेक्षकांनी म्हटले की,
कोविड-19 च्या नंतर त्यांनी पहिल्या पेक्ष कितीतरी जास्त यूट्यूबचा वापर केला आहे.

 

Web Title : YouTube | apps over 2 crore viewers in india streaming youtube on tvs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pradhan Mantri Kusum Yojana | ‘प्रधानमंत्री कुसुम योजना’ शेतकऱ्यांसाठी महत्वाची; जाणून घ्या

Pune News | ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांचा ‘हल्ला बोल’ ! कैट महाराष्ट्र व पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे आंदोलन

Body Builder Manoj Patil | मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटीलचा सुसाईडचा प्रयत्न