‘यूट्यूब’ची साफसफाई मोहिम ; ९० लाखांहून अधिक व्हीडिओ केले ‘डिलीट’, तुमचा व्हिडीओ आहे का ‘YouTube’वर

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियाचे भूत सर्वत्र आहे. यात व्हीडियो शेअरींगसाठी अनेक माध्यमे आहेत. त्यातुन अनेक धोकादायक आणि द्वेष पसरवणारे व्हीडिओ शेअर केले जातात. त्यामुळे समाजात आक्रमक आणि हिंसा होऊ शकते. त्यामुळे गुगलने एक मोठा निर्णय घेतला आहे. ‘गूगल’चा व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म म्हणजे ‘यूट्यूब’ आहे. अनेक लोक व्हीडिओ पाहण्यासाठी ‘यूट्यूब’चा वापर करतात. त्यावर अनेक धोकादायक आणि भडकवणारे व्हीडिओ असतात.

‘गूगल’ने ‘यूट्यूब’वरिल धोकादायक किंवा द्वेष पसरवणारे व्हीडिओ हटवण्याचं काम सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये असे तब्बल ९० लाखांहून अधिक व्हीडिओ यूट्यूबवरून हटवण्यात आलेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी सोमवारी ही माहिती दिली. समाजासाठी घातक असे व्हिडिओ पसरवण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नांचा हा भाग आहे, असं पिचाई यांनी सांगितलं.

यूट्यूबचा वापर भारतात सर्वाधिक होतो. भारतात जवळपास ८५ टक्के लोक मोबाईलवर व्हीडिओ पाहतात. गेल्या वर्षी हाच आकडा ७३ टक्केवर होता. जानेवारी २०१९ च्या आकड्यांनुसार, देशात यूट्यूबच्या मासिक सक्रीय उपभोक्त्यांची संख्या २६.५ करोडवर गेलीय. गेल्या वर्षी ही संख्या २२.५ करोड होती.

दरम्यान, यूट्यूबच्या वैश्विक मुख्य कार्यकारी सुझान वोजसिकी यांनी २६.५ करोड मासिक सक्रिय उपभोक्त्यांच्या संख्येनिशी सर्वात मोठा दर्शक वर्ग भारतात असल्याचे सांगितलं होतं. यूट्यूबच्या वार्षिक कार्यक्रम ‘ब्रॉ़डकास्ट इंडिया’ला संबोधित करताना त्या बोलत होत्या. जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या बाजारांपैंकी भारत एक आहे. भारतीय यूट्यूब चॅनलही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात १२०० भारतीय यूट्यूब चॅनेल असेही आहेत. ज्यांच्या सबस्क्रायबर्सची संख्या १० लाखांहून अधिक आहे. हीच संख्या पाच वर्षांपूर्वी केवळ दोनवर होती, असंही वोजसिकी यांनी सांगितलं.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन