‘YouTube’ ची ही सेवा होणार ‘बंद’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – You Tube आता त्यांचे एक महत्वाचे फिचर बंद करणार आहे. 18 सप्टेंबर पासून यूजर्स मेसेजचे फिचर वापरु शकणार नाही. 2017 साली युट्यूबवर प्रायवेट मेसेजचा फिचर आले होते. या फिचरमुळे यूजर्स एक दुसऱ्यांना प्रायवेट मेसेज करु शकत होते. परंतू गूगलने आता हे फिचर काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन वर्षापूर्व हे फिचर आणण्यात आले होते, यामुळे तुम्ही थेट मेसेजच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर करण्याचे फिचर आणण्यात आले होते. तेव्हापासूनच public conversation वर लक्ष देण्यात येत होते आणि त्याला प्रतिक्रिया, पोस्ट आणि स्टोरीज यावर अपडेट करण्यात आले होते.

ही सेवा देखील बंद –
गुगलने नुकतीच आपली दुसऱ्या अ‍ॅपची सेवा देखील बंद केली आहे. ट्रिप प्लानिंग अ‍ॅप google Trips ला बंद केले. याशिवाय google Allo देखील बंद करण्यात आले होते. तसेच google plus देखील बंद करण्यात आले आहे.

You Tube च्या रिपोर्टनुसार कंपनी You Tube Kids संबंधित जाहिरात देखील बंद करु शकते. फेडरल ट्रेड कमिशन यांसंबंधित तपास करत आहेत की यातून चिल्ड्रन प्रायवसीअ‍ॅक्टचे उल्लंघन होत आहे की नाही. परंतू यासंबंधित अजून कोणतीही बाब समोर आली नाही.

आरोग्यविषयक वृत्त –