‘या’ नवीन फीचरसह TikTok सोबत स्पर्धा करण्यास तयार YouTube, फीचरमध्ये काय ते जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टिकटॉक इतक्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहे की इतर मोठ्या कंपन्यादेखील त्याच धर्तीवर अ‍ॅप आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्मवरुन फेसबुक आणि इंस्टाग्राम हे दोघेही टिकटॉकशी स्पर्धा करण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, या शर्यतीत यूट्यूबही आले आहे. वास्तविक यूट्यूब एक नवीन फीचरची टेस्ट करीत आहे, ज्या अंतर्गत वापरकर्ते 15 सेकंदाचे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात. यूट्यूबने म्हटले आहे की मल्टी सेगमेंट व्हिडिओ फीचर नुसार काही वापरकर्त्यांना शॉर्ट व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा पर्याय दिला जात आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की यूट्यूबचे हे मल्टी सेगमेंट व्हिडिओ टेस्टिंग म्हणून मर्यादित वापरकर्त्यांसाठी अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) दोन्ही प्लॅटफॉर्मवर जारी केले जात आहेत. क्रिएटर्स या फीचरनुसार थेट मोबाइल अ‍ॅपवरून मल्टिपल क्लिप रेकॉर्ड करण्यात सक्षम होतील. यूट्यूबने म्हटले आहे की कंपनी क्रिएटर्ससाठी नवीन, सुलभ आणि सोप्या मार्गाची टेस्ट करीत आहे. यासह, त्या मल्टिपल क्लिप्स थेट व्हिडिओ म्हणून सहज रेकॉर्ड आणि अपलोड केल्या जाऊ शकतात आणि हे मोबाइल अ‍ॅपमधूनच करता येईल.

शॉर्ट व्हिडिओसाठी मोबाइल अपलोड फ्लो मध्ये ‘create a video’ वर टॅप करावे लागेल. येथे टॅप आणि होल्ड बटनाने रेकॉर्डिंग सुरु होईल आणि पहिली क्लिप रेकॉर्ड केली जाईल. यानंतर हे बटण सोडावे लागेल आणि रेकॉर्डिंग थांबवावे लागेल. अशा प्रकारे पुनरावृत्ती करून आपण 15-15 सेकंदांचे व्हिडिओ तयार करू शकता. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर वापरकर्त्यांना लांब व्हिडिओ अपलोड करायचे असतील तर त्यांना ते थेट गॅलरीमधून अपलोड करावे लागतील. लोक इन्स्टाग्राम आणि टिक टॉकवर शॉर्ट व्हिडिओकडे जात असल्याने यूट्यूबला देखील या क्रिएटर्सना आपल्या प्लॅटफॉर्मवर आणण्याची इच्छा आहे.