Youtube करणार कंटेन्ट क्रिएटर्सला मालामाल, लाँच केले ‘हे’ जबरदस्त फिचर; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूट्यूब आपल्या यूजर्ससाठी अनेक फिचर्स लाँच करत आहे. आता त्यांनी पुन्हा नवीन फिचर लाँच केले आहे, ज्याद्वारे कंटेन्ट क्रिएटर्स जास्तीत जास्त पैसे कामावू शकतात. या फिचरद्वारे यूजर आपल्या पसंतीच्या Youtube चॅनलला टिप देऊ शकतील. या फिचरचे नाव सुपर थँक्स (thanks feature) ठेवले आहे. या फिचरद्वारे कंटेन्ट क्रिएटर्सला पैसे कमावण्यासाठी मदत मिळेल. Youtube या फिचरद्वारे Facebook आणि Instagram ला मोठी टक्कर देईल.

50 डॉलरपर्यंत देऊ शकता टिप
यूट्यूबच्या सूपर थँक्स फिचर अंतर्गत यूजर आपल्या आवडीच्या यूट्यूब चॅनलला 2 डॉलर ते 50 डॉलरपर्यंत देऊ शकतात. तुम्ही पेमेंट करताच, दिलेली टिप कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा हाय लाईट केली जाईल. यातून कंटेन्ट क्रिएटरला सुद्धा समजले की, पैसे कुणी आणि किती दिले आहेत.

68 देशांमध्ये आहे हे फिचर
सुपर थँक्स फिचर सध्या केवळ 68 देशांमध्ये आहे. हे फिचर डेस्कटॉप आणि मोबाइल डिव्हाईसवर उपलब्ध आहे. हे फिचर अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही डिव्हाईसवर उपलब्ध केले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ते हे फिचर जास्तीत जास्त क्रिएटर्सपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

जास्तीत जास्त यूजर होतील कनेक्ट
हे फिचर काही व्हिडिओवर उपलब्ध होणार नाही.
यामध्ये केवळ प्रायव्हेट, एज रिस्ट्रिक्शन आणि अनलिस्टेड सारखे व्हिडिओंचा समावेश होईल.
या फिचरद्वारे क्रिएटर्स जास्तीत जास्त यूजर्सशी कनेक्ट करू शकतील.

Web Title :- youtube launch super thanks feature for video creators easily earn money know everything about it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही

‘या’ पद्धतीने आणि नाण्यांच्या बदल्यात मिळताहेत 1900 रुपयांपासून 1.5 लाख, तुमच्याकडे असतील तर ताबडतोब करा ‘हे’ काम

Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला