YouTube ची सर्वात मोठी कारवाई ! 8.30 कोटी Video आणि 700 कोटी कमेंट्स हटवल्या, जाणून घ्या कारण

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –   सोशल मीडियावर अनेक पोस्ट, व्हिडीओ अपलोड शेअर केल्या जात असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरील पोस्ट, व्हिडिओवर जगभरातून आक्षेप नोंदवण्यात येत आहेत. अमेरिकेत काही दिवसापूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प समर्थकांच्या हिंसाचारानंतर सोशल मीडियासंदर्भात अनेक चर्चा झाल्या. त्यानंतर आक्षेपार्ह आणि हिंसेला प्रोत्साहन तसेच चिथावणी देणाऱ्या पोस्ट, व्हिडिओ युट्यूब, फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम, इन्स्टाग्राम यांनी हटवले. त्यानंतर आता युट्यूब ने सर्वात मोठी कारवाई करत ८.३० कोटी व्हिडिओ आणि ७०० कोटी कमेंट्स हटवल्याचे समजते.

नुकतीच एक आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये २०१८ पासून ते आतापर्यंत युट्यूबने ८.३० कोटी व्हिडिओ हटवले आहेत. यसंसदर्भात युट्यूब प्रशासनाने सांगितले कि, हटवलेल्या व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह, कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केलेले आणि पोनोग्राफी संबंधित होते. तसेच ७०० कोटी कमेंट्सही हटवल्या आहे. यामध्ये विषेश म्हणजे प्रत्येक १० हजारांपैकी १६ ते १८ व्हिडिओ आक्षेपार्ह असतात.

आर्टिफिशियल यंत्रणा महत्त्वाची

आर्टिफिशियल इंटेलिजन्स यंत्रणेच्या माध्यमातून प्राथमिक पातळीवरच ९४ टक्के आक्षेपार्ह व्हिडिओ डिलीट करते, हटवते. त्यामुळे युट्यूबची हि यंत्रणा महत्त्वाची आहे. याशिवायही काही आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा कमेंट्स राहतात. सध्या आक्षेपार्ह व्हिडिओंची संख्या कमी होत असली, तरी हा गंभीर विषय आहे. यापूर्वी प्रति १० हजारांपैकी ६३ ते ७२ व्हिडिओ आक्षेपार्ह असत, असे युट्यूबचे सुरक्षा आणि विश्वसनीय टीमचे संचालक जेनिफर ओ’कॉनर यांनी सांगितले

आयरलँडमधून फेसबुक डाटा लीकचा तपास

फेसबुकचा मोठ्या प्रमाणात वापरकर्ता आहे. अलीकडेच एक धक्कादायक माहिती समोर आली असून जागतिक स्तरावरील ५३.३ कोटी तर भारतातील ६१ लाख युझर्सचा फेसबुक डेटा लीक झाला आहे. आता या प्रकरणाची आयरलँडमधूनही चौकशी केली जाणार आहेच पण त्याचबरोबर फेसबुकच्या दाव्याची समीक्षा केली जाणार आहे.

दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा फेसबुक युझर्सच्या डेटा सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, युझर्सचा गोपनीय डेटा सार्वजनिक झाला आहे. रिपोर्टनुसार यामध्ये युझर्सचे फोन क्रमांक, ईमेल यांसह खासगी माहितीचा समावेश आहे.