एमटीव्ही शोमधील ‘या’ स्पर्धकाचा अपघाती मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- आपल्या वेगळ्या हेरस्टाईलमुळे प्रकाश झोतात आलेल्या आणि लोकप्रिय युट्यूब आणि एमटीव्हीच्या ‘Ace of Space’ या शोमधील स्पर्धकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. दनिश जेहन (वय-२१) असे या स्पर्धकाचे नाव आहे. त्याच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहिली आहे. दानिश जेहन हा आज सकाळी एका लग्न समारंभावरुन घरी जात होता. वाशी येथे त्याच्या कारचा अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

काही दिवसांपूर्वी दानिशची हेअरस्टाईल सोशल मीडियावर वायरल झाली होती. हॉलीवूडचा पॉ़पस्टार जस्टीन बीबरसारखी हेअरस्टाईल दानिशने केली होती. त्याचा तो हटके लूक चाहत्यांना आवडला होता. एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला दानिश त्याच्या व्हिडीओ व ब्लॉग्जमुळे अल्पावधीतच प्रकाशझोतात आला होता.

एमटीव्हीच्या ‘Ace of Space’ या शोमध्येही अलीकडेच तो झळकला होता. यूट्यूब बरोबरच सोशल मीडियावरही तो सक्रीय होता. दानिशच्या अपघाती निधनामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला असून सोशल मीडियावर अनेकजणांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

तीन वाहनांचा विचित्र अपघात, ६ जण जखमी

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये गुरुवारी (२० डिसेंबर) तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेलर चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. नेरुळ पुलावर झालेल्या तीन गाड्यांच्या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातामुळे ठाणे-बेलापूर रोड वर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.