किरकोळ कारणावरून टोळक्याची तरुणाला मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भावाच्या कामाच्या ठिकाणी त्याला माहरान केल्याचे समजल्यानंतर तेथे गेलेल्या तरुणाला व त्याच्या मित्रांना ३ ते ४ तरुण व एका महिलेने चिकाव, बांबू, लोखंडी रॉडने आणि कोयत्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल साबळे (वय २०, रा. ताडीवाला रोड) या तरुणाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल साबळे याचा भाऊ क्वीन्स गार्डनर परिसरात काम करतो. त्याच्या कामावर त्याला व त्याच्या इतर दोन मित्रांना काही मुलांनी मारहाण केल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानुसार काय घडले हे पाहण्यासाठी तो मित्रांसह तेथे गेला.

त्यानंतर तेथे असलेल्या ४ तरुण आणि एका महिलेने विशाल साबळे आणि त्त्याच्या मित्रांना टिकाव, बांबू, लोखंडी रॉड, कोयते यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या चार दुचाकींचीही तोडफोड करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी. जी. शेंडगे करत आहेत.