यशराज फिल्म विरूध्द FIR, आर्टिस्टचे 100 कोटी हडपल्याचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तक्रारीत सांगण्यात आले आहे की, प्रोडक्शन हाउस म्यूजिक कंपोजर, आर्टिस्ट च्या आधारे रॉयल्टी घेऊ शकत नाही कारण याच्यावर पहिला अधिकार हा IPRS चा आहे. सध्या पोलिसांनी प्राथमिक तपास आणि पुराव्यांच्या आधारे केस दाखल करून घेतली आहे.

या सर्व प्रकारामुळे बॉलीवुड प्रोडक्शन हाउस यश राज फिल्म्स च्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मुंबई पोलीस च्या इकोनॉमिक ओफेंस विंग ने यशराज फिल्म्स च्या विरुद्ध १०० करोड हडपण्याच्या आरोपाखाली फिर्याद दिली आहे. ही केस गीतकार, संगीतकार, गायक आणि संगीत निर्माता यांच्या संबंधित आहे.

द इंडियन पर्फोर्मिंग राइट्स सोसायटी (IPRS)ने ही केस दाखल केली आहे. ही संस्था गीतकार, संगीतकार, गायक आणि संगीत निर्माता यांचे प्रतिनिधित्व करते. तक्रारीनुसार, यश राज फिल्म्स ने कलाकारांकडून बळजबरीने चुकीचे कॉन्ट्रैक्ट साइन करून घेतले होते आणि रॉयल्टी देखील बळजबरीने घेतली, खरतर त्याचा या रॉयल्टीशी काहीही संबंध नाही.

आदित्य चोपडाच्या अडचणी वाढल्या
तक्रारीत म्हटले आहे की, प्रोडक्शन हाउस म्यूजिक कंपोजर, आर्टिस्ट च्या आधारे रॉयल्टी घेऊ शकत नाही कारण याच्यावर पहिला अधिकार IPRS चा आहे. पोलीसांनी प्राथमिक तपास आणि पुराव्यांच्या आधारे केस दाखल केली आहे. पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, केस दाखल करून घेतली आहे. तसेच आम्ही यापुढील तपास देखील चालू केला असून गरज पडल्यास विचारपूस करण्यासाठी आरोपींना बोलवले जाईल अशी माहिती दिली.

तसेच मुंबई पोलीस ची इकोनॉमिक ओफेंस विंग अजून काही प्रोडक्शन हाऊस चा देखील तपास करत आहे. अशा प्रकारची कारवाई अन्य प्रोडक्शन हाऊस वर देखील होऊ शकते असे संकेत देखील दिले. पोलिसांनी IPC धारा ४०९ आणि ३४ यांशिवाय कॉपीराइट एक्ट च्या नुसार FIR दाखल केली आहे. FIR मध्ये यश राज फिल्म्स चे डायरेक्टर आदित्य आणि उदय चोपडा यांची नावं आहेत आणि हे मागील आठवड्यात दाखल करण्यात आले आहे.

Visit :  Policenama.com