महिला अधिकाऱ्याला धमकी, सत्ताधारी YSR काँग्रेसच्या आमदाराला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वायएसआर कॉंग्रेसचे आमदार के श्रीधर रेड्डी यांना रविवारी पहाटे अटक करण्यात आली. के श्रीधर रेड्डी यांच्यावर एका महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप आहे. याआधी श्रीधर रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या नावे शपथ घेतल्यामुळे चर्चेत आले होते.

वेंकटाचलम मंडळ परिषदेचे विकास अधिकारी ए. सरला यांना धमकावल्याचा आरोप आमदार के श्रीधर रेड्डी यांच्यावर आहे. त्याविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला यामुळे दबावाखाली असलेल्या पोलिसांना सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला अटक करावी लागली. ए. सरला यांनी असा आरोप केला आहे की, शुक्रवारी संध्याकाळी आमदार श्रीधर रेड्डी त्यांच्या घरी आले आणि त्यांना एका प्रोजेक्टच्या संदर्भात धमकावू लागले.

वाईएसआर कांग्रेस के विधायक के श्रीधर रेड्डी

ही बाब गांभीर्याने घेत मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी पोलिस महासंचालक गौतम सावंगा यांना आरोपींविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आणि सांगितले की, आरोपी दोषी असल्याचे पुरावे मिळताच आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. याबाबत आरोपी कोणीही असो कोणालाही सोडले जाणार नाही असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Visit : Policenama.com