ADV

Yugendra Pawar – Ajit Pawar | बारामतीचे ‘दादा’ बदला !, कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी

बारामती: Yugendra Pawar – Ajit Pawar | बारामती लोकसभा निवडणुकीच्या (Baramati Lok Sabha) विजयानंतर त्या मतदारसंघात नवचैतन्य निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) १० पैकी ८ खासदार निवडून आल्याने कार्यकर्त्यांचा विश्वास वाढल्याचे चित्र आहे. लोकसभेननंतर आता आगामी विधानसभेची सर्वच पक्षांकडून लगबग सुरु झाली आहे.(Yugendra Pawar – Ajit Pawar)

दरम्यान बारामती विधानसभेत अजित पवारांच्या विरोधात कोण असणार ? याबाबत चर्चा होती. त्याठिकाणी युगेंद्र पवार यांनी मागच्या काही काळापासून मतदारसंघात गाठीभेटी सुरु केलेल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार मैदानात उतरु शकतात. बारामतीत काका विरुद्ध पुतण्या? असा संघर्ष पुन्हा पाहायला मिळू शकतो.

युगेंद्र पवार यांना बारामतीतून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.
आम्हाला बारामतीचा दादा बदलायचाय, असं युगेंद्र पवार यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत.
त्यामुळे आगामी काळात याठिकाणी उमेदवारीबाबत शरद पवार काय निर्णय घेणार यावर सर्व काही अवलंबून असणार आहे.
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत.

युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार देखील आहेत. शरयु ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार व्यवसायामध्येही सक्रिय आहेत.
फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखान्याची जबाबदारी युगेंद्र पवार यांच्यावर आहे.
बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे देखील ते अध्यक्ष आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : कोयत्याने वार करत दगड, सिमेंटच्या गट्टूने ठेचून ताडी विक्रेत्याचा निर्घृण खून, तळवडे रोडवरील थरार

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : फोटो मॉर्फ करुन खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक, पोलिसांकडून कोलकाता येथील कॉल सेंटर उध्वस्त; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)

Raj Thackeray | बिनशर्त पाठिंबा तरी राज ठाकरेंना शपथविधीचे आमंत्रण का नाही? भाजपाकडून डॅमेज कंट्रोल सुरू?

Supriya Sule | पुण्यातील नालेसफाईच्या कामाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची सुप्रिया सुळे यांची मागणी