Yugendra Pawar | बारामती लोकसभेच्या यंदाच्या निकालाने युगेंद्र पवारांच्या विधानसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब?

बारामती: Yugendra Pawar | बारामती लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election Results 2024) निकाल नेमका काय असणार याबाबत अनेकांना मोठी उत्सुकता होती. दरम्यान सुप्रिया सुळे १ लाखांहून जास्त मताधिक्य मिळवत विजयी झाल्या. या मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) निवडणुकीच्या रिंगणात होत्या.

ही लढत अगदी अटीतटीची आणि प्रतिष्ठेची मानली गेली. निवडणुकीवेळी अजित पवारांचे बंधू, वहिनी , पुतणे यांनी अजित पवारांना साथ न देता ती शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे यांना दिली. विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त युगेंद्र पवार यांचा सहभागही या विजयात महत्वाचा ठरला.

आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार शरद पवार गटाकडून उभे राहू शकतात. अशी शक्यता वर्तवली जात आहे. मतदान संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते पक्ष कार्यालयात पोहोचले.

ग्रामीण, शहरी भागातील नागरिकांच्या प्रचारादरम्यान निदर्शनास आलेल्या विविध समस्यांवर त्यांनी काम करण्यास सुरुवात केली आहे. जिरायती भागातील पाणी समस्येवर त्यांनी सध्या लक्ष केंद्रित केले आहे. शरयु फाउंडेशनच्या माध्यमातून टँकर सुरू करून पाण्याची गरज भागविली जात आहे.

वादळी पावसाने नुकसान झालेल्या बाबुर्डी येथील शेतकऱ्यांना घर दुरुस्तीचे साहित्य त्यांनी पुरविण्यास पुढाकार घेतला.
बारामतीकरांशी जनसंपर्क वाढविण्यास त्यांनी भर दिला आहे. प्रत्येक गुरुवारी ते पक्ष कार्यालयात उपस्थित राहून
नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्यासाठी नागरिकांना अपॉइंटमेंट घेण्याची गरज नसल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

त्यामुळे युगेंद्र पवार यांनी एकप्रकारे विधानसभा निवडणुकीचीच तयारी केल्याचे मानले जाते.
सुप्रिया सुळे यांना बारामतीतून सर्वाधिक मताधिक्य मिळाले.
त्यामुळे त्यांनी बारामतीत केलेल्या प्रचाराचीच सुळे यांच्या विजयाच्या रूपाने पावती मिळाली आहे.

त्यामुळे बारामती लोकसभेच्या निकालानंतर त्यांच्या विधानसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले असल्याचे बोलले जात आहे.
मात्र या चर्चेला शरद पवारांकडून आगामी काळात बळ मिळणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bundgarden Pune Crime News | पुणे : बँक अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन

India Alliance | ‘गेम नॉट ओव्हर, वेट’ इंडिया आघाडीच्या ट्विटमुळे खळबळ

Khadakmal Ali Pune Crime News | पुणे : किरकोळ कारणावरुन पोलीस कर्मचाऱ्याकडून रॉडने मारहाण, गुन्हा दाखल (Video)