खळबळजनक ! 1993 साखळी बॉम्बस्फोटातील दोषी युसूफ मेमनचा कारागृहात मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटातील आरोपी युसूफ मेमन (वय-54) याचा मृत्यू झाला आहे. नाशिक कारागृहात तो शिक्षा भोगत होता. कारागृहात सकाळी युसूप मेमन याला हृदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीने सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

युसूफ मेमन हा 1993 मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी टायगर मेमनचा भाऊ होता. गेल्या 2 वर्षापासून युसूफ आणि इसाक नाशिक कारागृहात शिक्षा भोगत होते. दोघा आधी मुंबईतील आर्थर रोड कारारगृहात होते. युसूफच्या मृत्यूमुळे अंडरवर्ल्ड जगातमध्ये खळबळ उडाली आहे. मृतदेह धुळे येथील रुग्णालयात शवविच्छदनासाठी पाठवला आहे. कारागृह प्रशासनाने युसूफ मेमनला हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.