‘ तो ‘ व्हिडिओ अभिनंदनच्या पत्नीचा नाहीच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – बुधवारी पाकिस्तानमध्ये घुसखोरी केलेल्या एफ16 या विमानांचा पाठलाग करताना विंग कमांडर अभिनंदन यांचे मिग 21 लढाऊ विमान पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेच्या आत दुर्घटना झाली होती. त्यामध्ये  पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेले हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांच्यावरून  विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. युवा काँग्रेसचे मासिक ‘युवा देश’ने त्यांच्या ट्विटवरून  एका महिलेचा भाजप अभिनंदन यांच्यावरून राजकारण करत असल्याचा आरोप करणारा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. युवा देशने ही महिला म्हणजे अभिनंदन यांची पत्नी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा व्हिडीओ पंजाबचे पर्यटन मंत्री व काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी देखील रिट्विट केला आहे. मात्र काही वेळातच हा व्हिडीओ अभिनंदन यांच्या पत्नीचा नसल्याचे समोर आले आहे.

त्या व्हीडीओमध्ये ती महिला म्हणते मी एका लष्करी अधिकाऱ्याची पत्नी आहे. मला आपल्या जनतेला व राजकारण्यांना सांगायचे आहे की देशाच्या जवानांच्या बलिदानाचे राजकारण करू नका. तुम्हाला कल्पना नाही की अभिनंदन यांचे कुटुंब कोणत्या त्रासातून जातेय. मी तुम्हाला विनंती करते, की जोपर्यंत सीमेवरचा तणाव कमी होत नाही तोपर्यंत कृपया तुमच्या पॉलिटीकल रॅली थांबवा. तुमचे हे राजकारण थांबवा व जवानांचे श्रेय हिसकावून घेऊ नका. ही माझी सर्व राजकारण्यांना आणि विशेष करून भाजपच्या राजकारण्यांना विनंती आहे’ अशी  ती महिला बोलताना  दिसत  आहे.

हा व्हिडीओ युवा देशच्या हॅण्डलवरून ट्वीट झाल्यानंतर जवळपास दोन हजार लोकांनी त्याला रिट्विट केले आहे. यात काही विरोधी पक्षातील नेते देखील आहेत. मात्र काही वेळातच नेटकऱ्यांनी काँग्रेसच्या या खोट्या व्हिडीओचा पर्दाफाश केला. काहींनी तर हा व्हिडीओ रिट्विट करून दिल्ली पोलिसांना टॅग करत युवा देशवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

https://twitter.com/yuvadesh/status/1101076870194450432