पडद्यामागं ‘ही’ स्टार अ‍ॅन्कर आदित्य ठाकरेंबद्दल बोलली, म्हणाली – शिवसेनेचा राहुल गांधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पडद्यामागील बोल लाइव्ह गेल्याने अँकर अंजना ओम कश्यप यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा शिवसेनेचा राहुल गांधी म्हणून उल्लेख केला होता. याविषयी अँकरने स्पष्टीकरण दिले असले तरीही त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू आहे.

‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीच्या ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’ कार्यक्रमात आदित्य ठाकरे पोहोचले होते. जेव्हा हे वृत्त चॅनलवर प्रसारीत करण्यात आलं त्यावेळी चॅनलमधील ‘पीसीआर’ टीमकडून अँकर अंजना ओम कश्यप यांचा माइक ऑन राहिला होता. पण, अंजना यांना याबाबतची कल्पना नव्हती. त्यावेळी चॅनलवर एकीकडे आदित्य ठाकरेंची दृष्य प्रसारीत होत असतानाच, ‘ये शिवसेना का राहुल गांधी साबित होगा, लिखकर रख लीजिए’ असं विधान अंजना ओम कश्यप यांनी केलं. काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यामुळे अँकर अंजना ओम कश्यप यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवर दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. तरीदेखील त्यांच्यावर टीका सुरु आहे.
Aditya Thackeray
दिलगिरी व्यक्त करताना कश्यप म्हणाल्या की, आदित्य ठाकरेंसंदर्भातलं माझं वक्तव्य मला परिस्थितीचं नीट आकलन न झाल्यामुळे घडलेली चूक होती. याची मला खंत आहे. ही माझी वैयक्तिक प्रतिक्रिया होती. त्याचा वृत्तवाहिनीशी कोणताही संबंध नाही.

त्यांच्या या विधानावर शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आक्षेप घेत अप्रत्यक्ष टीका केली आहे. ‘कोण काय सिद्ध होईल हे वेळच निश्चित करेल. पण काही लोक तर आधीच विकले गेलेत हे सिद्ध झालं आहे. पत्रकारितेवर लक्ष केंद्रीत करा, भविष्यवाणी तर पोपटही पैसे घेऊन करतो,’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

Visit – policenama.com